Ad will apear here
Next
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९३वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात
ठाणे : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील संघटनेतर्फे पक्षाचा ९३वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. कुडूस येथून महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या कार्यालयाजवळून काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो जण सहभागी झाले होते. 

सीपीआय जिंदाबाद, शेतकरी-कष्टकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांच्या गजरामध्ये ही रॅली निघाली होती. चिंचघरच्या ह. वि. पाटील विद्यालयाच्या पटांगणात या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. चार हजार जण यासाठी उपस्थित होते. ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्यांनी ‘हक्कासाठी न्यायासाठी लढण्यासाठी चला रे’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. 

या वेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. मधुकर पाटील. कॉ. शिवराम पाटील. कॉ. सुनील पाटील. कॉ. चंद्रकांत चौधरी. कॉ. आत्माराम विशे, कॉ. रमेश जाधव, कॉ. विजय कांबळे, कॉ. कल्पेश पाटील, कॉ. कपिल पाटील आदी उपस्थित होते. 

‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सतत लढणारा पक्ष असून, रेशन, पेन्शन, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदेलने करणारा एकमेव पक्ष आहे. कष्टकरी, कामगार यांना न्याय मिळावा यासाठी सतत लढत राहू. कार्यकर्त्यांना मार्क्सवाद शिकवायला लागेल. त्यांचे विचार प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवायला हवेत,’ असे कॉ. मधुकर पाटील यांनी सांगितले. या वेळी कॉ. अॅड. कल्पेश पाटील, प्रा. कॉ. काव्या पाटील, कॉ. तनुजा फाफे, कॉ. रितेश गायकर, कॉ. अक्षय पाटील यांनी चळवळीच्या गाण्यातून प्रबोधन केले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZLEBV
Similar Posts
मासवण आश्रमशाळेत रंगला ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ पालघर : साहित्यविषयक रुची व ज्ञान वाढीस लागावे आणि आपली बोली भाषा जतन व्हावी म्हणून वसई येथील शब्दांगण प्रस्तुत ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ या उपक्रमाचा २४वा प्रयोग पालघर येथील मासवण आश्रमशाळेत झाला.
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली
चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबई : अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी चार नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीव राज्याच्या मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला
पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा नागरी सत्कार वाडा : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी तालुक्यातील वडवली या गावातील निवृत्त उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव व त्यांचे भाऊ प्रकाश जाधव यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास अवघ्या महिन्याभरात पूर्ण केला. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून कुडूस ग्रामपंचायत सभागृहात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language